बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने नुकतेच एक असे ट्विट केले आहे. जे पाहून प्रथम त्याच्या ट्विटवर तुमचा विश्वासही बसणार नाही. शाहरुखने त्याच्या ट्विटमध्ये फराह खानने त्याचे शोषण केल्याचे म्हटले. पण हे त्याने गंभीरपणे नव्हे तर मस्करीत म्हटले आहे. त्याचं झाले असे की, फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ सिनेमाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने अनेक कलाकारांनी गुरूवार सकाळपासूनच सिनेमाशी निगडीत अनेक किस्से आणि फोटो शेअर करायला सुरूवात केली. फराह खानपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत आणि शाहरुख खानपासून ते शिरीष कुंदरपर्यंत साऱ्यांनीच आपले आवडते फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews